रविवार, जानेवारी 29, 2023

Nigdi News : जेवण बरोबर नसल्याच्या वादातून महिलेने भावाला बोलवत पती व सासर्‍यास केली मारहाण

एमपीसी न्यूज : जेवण बरोबर नसल्याच्या वादातून महिलेने आपल्या भावाला बोलावून स्वताच्याच पती व  सासर्‍यास मारहाण केली आहे. यामध्ये ते जखमी झाले आहेत.(Nigdi News)ही घटना आज दुपारी निगडी ओटा स्कीम येथे घडली आहे.

याबाबत शौकत अली शेख, वय 40 वर्ष, रा. श्रमिकनगर, ओटा स्कीम, निगडी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सलीम शेख व त्याचा लहान भाऊ, दोघे रा. चिकन चौक, निगडी यांच्या विरोधात भा.द.वि कलम 324, 504, 506 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालय वाणिज्य शाखेच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन 

या घटणेबाबत पोलिसांनी माहिती दिली की, फिर्यादी व त्यांच्या मुलाच्या पत्नी(सुने) बरोबर जेवण बरोबर नसल्याचा कारणावरून वाद झाला. त्यामुळे चिडून सुनेने तिच्या भावाला बोलवले.(Nigdi News) आरोपी सलमान व त्याचा लहान भाऊ तेथे आले व त्यांनी जर्मन च्या पट्टीने फिर्यादी व त्यांच्या मुलाच्या डोक्यावर मारले. यामध्ये ते किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Latest news
Related news