Nigdi : उद्योगनगरीने उभारली सामाजिक बांधिलकीची गुढी

एमपीसी न्यूज – साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडव्याचा सण पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी (दि. 6) उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून विविध प्रबोधनात्मक उपक्रमही घेण्यात आले.

गुढीपाडव्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी शोभायात्रा आयोजित करण्यात आली. पारंपरिक पोशाख घालून ढोल ताशांच्या गजरात ,वाद्यवृदांच्या साथीने पुरुष, महिला व लहान मुलांनी या स्वागत यात्रेत सहभाग नोंदविला. भारतीय संस्कृती मंच व विकास महासंघाच्यावतीने निघालेल्या यमुनानगर येथील शोभायात्रेत विविध संस्कृतीचे दर्शन पहायला मिळाले.

गुढीपाडव्यानिमित्त निमित्त शहरातील विविध मंडळांच्यावतीने प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये भगवे फेटे आणि पारंपरिक वेशभूषेत पुरूष आणि महिला नागरिक सहभागी झाले हेते. भगवे फेटे आणि पारंपारिक वेशभूषेत नागरिक यामध्ये सहभागी होते. यमुनानगर येथे भारतीय संस्कृती मंचाच्या यमुनानगर शाखेच्या वतीने शोभायात्रा काढली होती. ढोल, झांज, लेझीम पथक सहभागी झाले होते.

मिरवणुकीत मावळय़ांच्या पोशाखात घोडेस्वार, पारंपारिक वेशभूषेतील महिला, मुले सहभागी होते. विविध संस्थाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.