BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi: पार्थ पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला आहे. निगडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना पार्थ यांनी मोदी यांचा एकेरी शब्दांत उल्लेख केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ (शनिवारी) निगडीत एक बैठक झाली. या बैठकीला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पार्थ यांनी भाषण केले. त्या भाषणात त्यांनी मोदी यांचा एकेरी उल्लेख केला. ‘तो एक मोदी गुजरात भारतभर मांडू शकतो. तर, पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रभर का नाही मांडू शकत’ असा एकेरी उल्लेख पार्थ यांनी केला होता.

  • राष्ट्रवादीने शहराचा केलेला विकास तरुण वर्गाला दाखवा. त्याची जबाबादारी आपल्यावर आहे. सर्वांनी तरुणांना आपल्या काळात झालेला विकास दाखविला पाहिजे असे सांगत पार्थ पुढे म्हणाले, आता आपल्याकडे केवळ 35 दिवस राहिले आहेत.

आपल्याला सर्वाना एकत्र राहून काम करायचे आहे. मतभेद विसरून सर्वांनी एकदिलाने काम करावे. आपल्याला आजोबांना म्हणजे शरद पवार यांना पंतप्रधान करायच आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.