BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : उद्योगनगरीतील नवोदित गायक फ्रॅंक पीटर्स (व्हिडिओ)

कमी वयातच गायक होण्याचे स्वप्न पूर्ण

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- भारतीय सांस्कृतिक चळवळीला प्राचीन इतिहास आहे. कधीकाळी राजे-रजवाड्यांच्या मनोरंजनाचे साधन म्हणून ओळखली जाणारी कला आज प्रबोधनाचे एक प्रमुख माध्यम झाले आहे. भारताला लाभलेला हा प्रबोधनाचा वारसा नवी पिढी पुढे नेत असून महाराष्ट्रात अनेक शाहीर, कलावंत आपल्या कलेतून प्रबोधन करताना दिसतात. असाच नवीन गायक उदयास येत आहे तो म्हणजे निगडी यमुनानगरमधील फ्रॅंक पीटर्स.

लहानपणांपासूनच गायनाची आवड होती. प्रत्येकाला आपले गुरु असतात. पण मी स्वतःच माझा गुरु असल्याचे पिटर फ्रॅंक सांगतो. त्याचा सगळ्यात पहिला अल्बम 2008-09मध्ये ये जिंदगी वर रिलिज झाला. त्या अल्बमला रसिकांनी पसंती दिली. त्यातूनच त्याला गायनाची स्फूर्ती मिळत गेली. गायनाची हीच चौकट मोडण्याचा प्रयत्न पिटर फ्रॅंक याने केला. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून फ्रॅंक पीटर्स याने संगीतामध्ये शिक्षण पूर्ण केले. संगीताची रुची असल्यामुळे संगीत क्षेत्रात स्वतःला झोकून देण्यापूर्वी संगीताचा गाढा अभ्यास केला. त्याची स्वतःची पिटर्स म्युझिकल नावाची संगीत अकादमी आहे. त्यातून आज या अकादमीमधून अनेक नवोदित गायक जन्माला येत आहेत. वाद्यांच्या मूळ नादात वेस्टर्न आणि रॉक म्युझिक एकत्र करून नवीन नाद निर्माण करण्याची जिद्द त्यांच्यात दिसून येत आहे.

दुसर्‍याच्या दावणीला बांधण्यापेक्षा स्वतःचे विश्व निर्माण करण्याची उमेद असणारा हा असा तरुण. रॉक पध्दतीने गाणी बनू शकतात हे त्याने स्वतः कृतीतून करुन दाखविले. आपल्या पहिल्या वहिल्या अल्बमच्या क्वालिटीला कुठेही ठेच पोहचू द्यायची नाही, तसेच त्याच्या अनोख्या संकल्पनेत आज फ्रॅंकने स्वतःचा असा एक ब्रॅण्ड तयार केला आहे.

आपल्या गायनाच्या प्रवासाबाबत तो सांगतो, सुरुवातीला मी अकाऊंटट म्हणून काम करत होतो. पण तिथे मन रमेना. म्हणूनच स्वतःची संगीतवाद्य अकादमी यमुनानगरला सुरु केली. त्याच्या स्वतःच्या रावेत व यमुनानगर अशा दोन ठिकाणी संगीत अकादमीची शाखा आहे. मी स्वतः गाणी तयार करत असून अनेक अल्बम रिलिज झाले आहेत. त्यात तेरी कृपा, नाम से असे अल्बम प्रसिध्द झाले आहेत असे तो म्हणाला.

.

HB_POST_END_FTR-A1
.