Nigdi : पिंपरी-चिंचवड शहर भाजपची युवती कार्यकारिणी जाहीर

उपाध्यक्षपदी सुप्रिया दिपलक यांची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पक्ष युवती आघाडीच्या कार्यकारिणीत निवड झालेल्या युवतींना पक्षाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.

यावेळी युवती आघाडीच्या शहराध्यक्षा तेजस्विनी कदम उपस्थित होत्या. युवती आघाडीच्या शहर उपाध्यक्षपदी दिघीतील सुप्रिया दिपलक, चिटणीसपदी वाल्हेकरवाडी येथील प्रियांका जाधव-काटकर, कार्यकारिणी सदस्यपदी वाल्हेकरवाडी येथील सारिका परदेशी, आकुर्डी, दत्तवाडी येथील निशा गुप्ता आणि भोसरी, लांडेवाडी येथील मोक्षदा गायकवाड, आकुर्डी गावठाणातील आरती बोंबे, निगडी, रुपीनगर येथील रोशनी गुरूंग यांची निवड करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.