Nigdi Plagathon campaign : महानगरपालिकेला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी निगडीमध्ये ‘प्लागेथोन’ अभियानाचे आयोजन

एमपीसी न्यूज : आज (8 मे) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत प्रभाग क्रमांक १३ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत सेक्टर 22, निगडी येथे ‘प्लागेथोन’ (Nigdi Plagathon campaign) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सुरुवात राहुल नगरपासून झाली. तर, स्मशानभूमी DCB हद्द येथे अभियानाचा समारोप झाला. या कार्यक्रमाची सुरुवात स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आली. नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभागी होत सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘’स्वच्छतेच्या या चळवळीमध्ये (Nigdi Plagathon campaign) सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन एक लोकचळवळ उभी व्हावी,’’ असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरीक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.

महानगरपालिकेला सर्वोत्कृष्ट बनवण्याचा संकल्प –

या अभियानात महिलांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली. त्यांनी स्वच्छतेबाबत इतर नागरिकांना संदेश दिला. ‘महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०२२’मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी महानगरपालिका सर्वोतोपरीने प्रयत्न करत असून नागरीकांच्या ऊस्फुर्त सहभागाने या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसून येत आहे.

Pimpri Plagathon Expedition : प्लागेथोन अभियानांतर्गत साडेसहा टन कचऱ्याचे संकलन

यावेळी (Nigdi Plagathon campaign) ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे, कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग अधिकारी काळे,कनिष्ठ अभियंता विद्युत विभागाचे रोकडे साहेब, सहाय्यक आरोग्य अधिकारी सुधीर वाघमारे तसेच, नगरसेवक सचिन चिखले, प्रभाग क्रमांक १३ चे आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, सागर कोरे, राजू चटोले, बि. व्ही. जी.  सुपरवाईजर अबू जाधव, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयामधील महानगरपालिका कर्मचारी, आरोग्य विभागातील सफाई कामगार आणि सर्व जनवाणी पर्यवेक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.