Nigdi: प्राधिकरणातील नियोजित मिसळ महोत्सव पावसामुळे लांबणीवर

'मिसळ महोत्सव' आणि 'भव्य शॉपिंग फेस्टिवल' महोत्सवाच्या संयोजकांची माहिती

एमपीसी न्यूज – खास दिवाळीनिमित्त येत्या 11 ते 13 ऑक्टोबर रोजी प्राधिकरण येथील नियोजित महापौर बंगला मैदानावर आयोजित करण्यात आलेला सवाई मसाले प्रस्तुत ‘मिसळ महोत्सव’ आणि ‘भव्य शॉपिंग फेस्टिवल’ अवकाळी पावसामुळे लांबणीवर टाकण्यात आला आहे, अशी माहिती महोत्सवाच्या संयोजकांनी दिली आहे.

मुसळधार पावसामुळे महोत्सवाच्या मैदानात चिखल झाला असून मंडप घालणेही अवघड झाले आहे. त्यातच आगामी काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे स्टॉलधारक व ग्राहक दोघांचीही संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी हा महोत्सव काही दिवस लांबणीवर टाकण्यात येत आहे. मिसळ महोत्सवाच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे संयोजकांनी कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like