Nigdi : ओटास्कीम येथे जुगार अड्ड्यावर छापा
एमपीसी न्यूज – निगडी पोलिसांनी जुगार अडड्यावर छापा मारत दोन आरोपींना अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 1) सायंकाळी सहा वाजता ओटास्किम येथे केली.
बाबु गुंडाप्पा कडगुस (वय 35, रा. ओटास्कीम, निगडी), सुमित विजय जाधव (वय 27, रा. ओटास्कीम, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्कीम येथील संग्राममगर झोपडपट्टीच्या बाजूला दोघे जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 150 रुपये रोख आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.