Nigdi: वर्दीतील माणुसकी! कामगार निवारा केंद्रातील कामगारांना पोलिसांकडून कपडे वाटप

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे कामगारांच्या हाताला काम मिळत नाही. तसेच अनेक कामगार शहरात ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आकुर्डी येथील कामगारांना निगडी पोलिसांच्या वतीने कपडे वाटप करण्यात आले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी याबाबत माहिती दिली. आकुर्डी येथील कामगार निवारा केंद्रात 92 कामगारांना ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये 54 पुरुष, 27 महिला आणि 11 लहान मुले आहेत. त्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

निगडी पोलिसांकडून आकुर्डी येथील कामगार निवारा केंद्रातील 92 जणांना कपडे वाटप करण्यात आले. 54 पुरुषांना शर्ट, पॅन्ट, 27 महिलांना साड्या, 11 लहान मुलांना कपडे वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.