Nigdi Police : निगडी पोलिसांनी पाच आरोपींना मिळवून दिली शिक्षा

एमपीसी न्यूज – निगडी पोलीस (Nigdi Police) ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या चार आणि चोरीच्या तीन गुन्ह्यातील पाच आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. सात वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपींना कैदेची आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. यामुळे निगडी पोलीस ठाण्यातील दोषसिद्धीचे प्रमाण वाढले आहे.

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुग्धा मनोज देशपांडे (वय 39) यांची दुचाकी शेतकरी मळा हॉटेल येथून 23 डिसेंबर 2017 रोजी चोरीला गेली. तपास अंमलदार विलास केकाण यांनी आरोपी शिवा चंद्रभान गौतम (वय 20, रा. कुदळवाडी, चिखली) याला 28 फेब्रुवारी 2021 रोजी अटक केली. त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करून गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. त्यामध्ये आरोपीला दोषी ठरवून न्यायालयाने दोन वर्ष एक महिना साधी कैद आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास पाच दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

 निखिल बाळासाहेब तापकीर (वय 34, रा. चिंचवड) त्यांच्या घरातून 75 हजारांचे मोबाईल, लॅपटॉप चोरून नेल्याप्रकरणी तपास अधिकारी उपनिरीक्षक वर्षाराणी घाटे यांनी अभय देवराव राऊत (रा. खारड, ता. मुदखेडा, जि. नांदेड) याला अटक केली. त्याला दीड महिना कैद आणि पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पाच दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

Kothurne Case : कोथुर्णे घटनेतील आरोपीला फाशीच्या शिक्षेसाठी सर्वस्व पणाला लावू – अजित पवार

मंजू मांगीलाल सिसोदिया (वय 61, रा. प्राधिकरण, निगडी), गीता मोहन भुजंग (वय 75, रा. प्राधिकरण, निगडी), शारदा शांताराम रणवरे (वय 66, रा. प्राधिकरण निगडी), साक्षी दिनेश मडके (वय 44, रा. प्राधिकरण निगडी) यांनी वेगवेगळ्या प्रकरणात जबरी चोरीचे गुन्हे दाखल केले होते. ते चारही गुन्हे प्रभाकर येमनप्पा दोडमणी (वय 26, रा. चिंचवड), अल्ताफ सलीम शेख (वय 20, रा. चिखली) यांना अटक करण्यात आली होती. त्यातील दोन गुन्ह्यात 19 महिने साधी कैद, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 10 दिवस साधी कैद, तिस-या गुन्ह्यात 19 महिने साधी कैद, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सात दिवस साधी कैद, चौथ्या गुन्ह्यात दोन वर्षे सात महिने साधी कैद, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सात दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

आशिष संजय पारकर (वय 28, रा. आकुर्डी) यांनी जानेवारी 2021 मध्ये दिलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यात आरोपी मनोज नागेश मुळे (वय 22, रा. देहूरोड) याला 13 महिने साधी कैद (Nigdi Police) व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सात दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

Pune : पोपटाच्या त्रासाची तक्रार केली म्हणून शिवीगाळ करून मारण्याची धमकी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.