Nigdi: हजारो दीपज्योतींनी उजळली प्राधिकरणातील उद्याने!

एमपीसी न्यूज – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा यांचे औचित्य साधून शर्मिला बाबर सखी मंचाच्या वतीने सोमवारी (28 ऑक्टोबर) निगडी-प्राधिकरण भागात दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यांतर्गत संत तुकाराम उद्यान (पेठ क्रमांक २७), माउली उद्यान (पेठ क्रमांक २७अ) आणि सोमेश्वर मंदिर उद्यान (पेठ क्रमांक २५) या ठिकाणी प्रत्येकी दोन ते तीन हजार दिवे प्रज्वलित करून परिसर उजळविण्यात आला. विशेष बाब म्हणजे या दीपोत्सवात लहान मुले, तरुण आणि महिला तसेच ज्येष्ठ नागरिक अशा आबालवृद्धांनी सक्रिय सहभाग घेतला.

_MPC_DIR_MPU_II

श्री संत तुकाराम प्रतिष्ठान, विठ्ठल- रुक्मिणी प्रेरणा मंडळ, सोमेश्वर मंदिर विश्वस्त मंडळ, नवनगर मित्रमंडळ या संस्थांच्या माध्यमातून दीपोत्सवासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘अ’ प्रभाग समिती अध्यक्षा नगरसेविका शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर, राजेंद्र कदम, चेतन पवळ, हर्षल लाहोटी, जयंत चित्तापाचे आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते. सोहळ्याचा समारोप सोमेश्वर मंदिरात सामुदायिक आरतीने करण्यात आला. या प्रसंगी शर्मिला बाबर यांनी नागरिकांना समृद्ध आणि आरोग्यपूर्ण जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या संयोजनात अर्चना निकम, अंजली पाटील, सविता साने, रेखा कदम, प्रिया पवळ, शुभांगी धनवडे, सुनीता बाबर, सुनीता लाहोटी, स्नेहल करपे, सिमरन नदाफ, तेजस्विनी ठोंबरे यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.