Nigdi fraud : प्लॉट देण्याच्या बहाण्याने पावणे तीन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथे प्लॉट देण्याच्या बहाण्याने तिघांनी एका व्यक्तीची दोन कोटी 76 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. (Nigdi fraud)हा प्रकार नोव्हेंबर 2017 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत पुणे आणि निगडी प्राधिकरण येथे घडला.

सोनीत सोमनाथ परदेशी (वय 38, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नरेंद्र रामचंद्र शेंगर (रा. प्राधिकरण निगडी), धर्मा सोनू गोल्हार (वय 38, रा. चिंचवडेनगर, चिंचवड), एक महिला (रा. बिबवेवाडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dighi News : रिक्षा चालवण्याच्या बहाण्याने रिक्षाची केली चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेंद्र याने फिर्यादींना निगडी प्राधिकरण येथे सहा हजार चौरस फुटांचे दोन प्लॉट देतो, असे भासवले. त्यापोटी धर्मा आणि महिला यांच्या बँक खात्यावर दोन कोटी 90 लाख रुपये घेतले. त्यानंतर प्लॉट न दिल्याने फिर्यादींनी पैशांची वारंवार मागणी केली असता आरोपींनी 13 लाख 50 हजार रुपये परत केले. उर्वरित दोन कोटी 76 लाख 50 हजार रुपये परत केले नाहीत.(Nigdi fraud) फिर्यादींनी पैसे परत मागितले असता, पैसे मागितल्यास आम्ही पोलीस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल करू, अशी आरोपींनी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.