Samartha Pratisthan : प्राधिकरण येथील श्री समर्थ प्रतिष्ठानचा देखणा श्रीराम मंदिर देखावा

एमपीसी न्यूज : निगडी, प्राधिकरण येथील श्री समर्थ युवक प्रतिष्ठानतर्फे यंदा श्रीराम मंदिराचा प्रतिकात्मक देखावा उभारण्यात आला आहे.(Samartha Pratisthan) अत्यंत कलात्मक पध्दतीने उभारण्यात आलेला हा भव्य देखावा प्राधिकरणातील जलतरण तलावा शेजारी आहे.

मागील दोन वर्षे करोनाच्या निर्बंधांमुळे सर्व प्रकारचे सण, उत्सवांच्या साजरे करण्यावर बंधने होती. पण यंदा करोना थोडा आटोक्यात आला असल्याने नागरिक उत्साहाने सण साजरे करत आहेत.(Samartha Pratisthan)  त्यामुळे यंदा श्री समर्थ युवक प्रतिष्ठानच्या वतीने हा देखावा तयार करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांनी देवीचे दर्शन घेण्यासाठी अवश्य यावे असे भाविक भक्तांना आवाहन केले आहे.

Youth congress protest : विद्यापीठाच्या पैशातून संसारोपयोगी साहित्याची खरेदी, कुलगुरूंच्या विरोधात प्रदेश युवक काँग्रेसचे आंदोलन 

अत्यंत आश्वासक अशी ही तुळजाभवानी देवीची मूर्ती असून भक्तांच्या रक्षणासाठी सदैव धावून येणाऱ्या या जगत जननीचे हे देखणे आणि सुंदर रुप डोळ्यात साठवून ठेवावे असेच आहे.(Samartha Pratisthan) नवरात्रीच्या दहा दिवसांत देवीची प्रार्थना, पूजन करुन तिची करुणा आपल्यावर सदैव राहावी यासाठी प्रत्येकजण मनोभावे पूजा, अर्चना करत असतो. आपल्या मनीचे गुज या तुळजाभवानी आईसमोर मांडण्यासाठी येथे भक्तांची रीघ लागलेली असते.

यंदा मंडळाने पंधरा वर्षे पूर्ण करुन सोळाव्या वर्षात पदार्पण केले आहे. तसेच दसऱ्याच्या दिवशी रावणदहन देखील होणार आहे. त्यावेळी देखील आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.