BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : सर्व धर्मांची शिकवण समानता आणि मानवता शिकविते – प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब

41
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – सर्व धर्मांची शिकवण समानता आणि मानवता शिकविते. वर्तमानाबरोबरच भविष्याचा देखील वेध संतमहात्मे घेत असतात. आपण ज्याप्रमाणे कपड्यांवर पडलेला डाग धुवून काढतो व ते कापड पुन्हा वापरण्यायोग्य करतो तसेच पापी माणूस जरी त्याच्या पापाचे प्रायश्चित घेऊन माफी मागत असेल व शुद्ध आचार, विचारांनी जीवन जगत असेल तर त्याने केलेल्या पापाबद्दल त्याला माफी मिळते. आपल्या जीवनात देखील साचलेले पाप-दोष हे तप, साधनेने दूर होतात. एवढी प्रबळ शक्ती साधनेत आहे असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी केले.

निगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे पवित्र चातुर्मास महिन्यानिमित्त प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले होते. यावेळी संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते.

प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब म्हणाल्या की, गरीब, श्रीमंत, जात-पात, पंथ हे भेदभाव दूर करण्याची शिकवण संत महात्म्यांनी वेळोवेळी दिली आहे; परंतु आज 21 व्या शतकात देखील अनेक धर्म, पंथ, जाती आहेत. प्रत्येकाचे आचरण भले वेगळे असले तरी, सर्व धर्मांची शिकवण समानता आणि मानवता शिकविते. पर्यावरणाप्रती आत्मा तटस्थ केल्याशिवाय शुद्धी होत नाही. यासाठी ‘कल्पसूत्र’ या तत्वार्थ सूत्राचे वाचन आणि विवेचन यामध्ये केले जाते. संत-मुनी आणि विद्वानांच्या सानिध्यात स्वाध्याय केला जातो. पूजा-अर्चना, आरती, त्याग, तपस्या आणि उपवास करून अधिकाधिक वेळ संताच्या सानिध्यात घालवावा. असे मार्गदर्शन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी केले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.