Nigdi : पादचारी महिलेची पर्स हिसकावली

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेची पर्स दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावली. ही घटना बुधवारी (दि. 25) सायंकाळी साडेसातच्या सुमारास संभाजीनगर येथे घडली.

लक्ष्मीकांत दलसुखराम मेवाडा (वय 52, रा. शिवाजी पार्क, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मीकांत आणि त्यांची पत्नी बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास संभाजीनगर येथीलच्या समोरील सार्वजनिक रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी मोटसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी लक्ष्मीकांत यांच्या पत्नीच्या हातातील पर्स हिसकावून नेली. पर्समध्ये एक मोबाईल फोन आणि रोकड असा एकूण 6 हजार 600 रुपयांचा ऐवज होता. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.