Nigdi : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान महिलेची पर्स चोरीला

एमपीसी न्यूज – बसमध्ये चढताना महिलेची अज्ञात चोरट्यांनी पर्स चोरून नेली. त्यामध्ये 70 हजारांची रोख रक्कम होती. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी पावणेअकराच्या सुमारास निगडी येथील पवळे उड्डाणपुलाजवळ घडली.

ज्योती राजाराम चव्हाण, (वय 50, रा. शरदनगर, चिखली. मुळ. रा. रास्तीपूरा, ठाकूर मोहल्ला, ता. जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्योती गुरुवारी त्यांच्या शरदनगर येथे राहणाऱ्या बहिणीकडे त्यांच्या नातेवाईकांसोबत आल्या होत्या. शनिवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास त्या पुन्हा जाण्यासाठी निघाल्या. सर्वजण निगडी येथील पवळे उड्डाणपुलाजवळ बस स्टॉपवर आले. निगडी ते स्वारगेट या बसमध्ये बसल्यानंतर ज्योती यांनी त्यांची बॅग तपासली असता त्यांच्या बॅगमधील पर्स नसल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पर्समध्ये 70 हजार रुपये रोख रक्कम आणि महत्त्वाचे कागदपत्रे होते. अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांची पर्स चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.