Nigdi : पावसामुळे थांबवलेली उदयनराजेंची सभा पुन्हा सुरु

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आज निगडी प्राधिकरणात छत्रपती खासदार उदयनराजे महाराज यांची सभा अचानक आलेल्या पावसामुळे थांबवण्यात आली होती. त्यामुळे उदयनराजे यांचे भाषण ऐकण्यासाठी जमलेले उदयनराजे यांचे चाहते पावसामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर गेले होते. आता पाऊस थांबल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्राधिकरणातील सभेला सुरुवात झाली आहे.

याठिकाणी माजी मंत्री, आमदार शशिकांत शिंदे उपस्थित असून कासारवाडीचे माजी नगरसेवक, काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले किरण मोटे देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर हजर झाले आहेत. खासदार उदयनराजे यांचेही सभेच्या ठिकाणी आगमन झाले आहे.

दरम्यान, शिवसेनेत असलेले माजी नगरसेवक विनायक रणसुभे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे तसेच किरण मोटे यांचा देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.