Nigdi : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ रुपीनगरमध्ये रॅली

एमपीसी न्यूज – शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आज, शुक्रवारी रुपीनगर भागातून रॅली काढण्यात आली. 
रुपीनगर, ओटा स्किम, निगडी गावठाण, यमुनानगर, अजंठानगर, त्रिवेणीनगर, कुदळवाडी, जाधववाडी, सेक्टर नं. 16, बालाजीनगर, गवळीमाथा, यशवंतनगर, विठ्ठलनगर, नेहरुनगर, उद्यमनगर, अजमेरा कॉलनी,मासुळकर कॉलनी या भागात ही रॅली काढण्यात आली.
यावेळी आढळराव पाटील म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी  भारताची ताकद जगाला दाखवून दिली. दुसऱ्या बाजूला गोरगरिबांसाठी आयुष्यमान भारत, उज्ज्वला गॅस, मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया, स्कील इंडिया अशा अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामुळे देशातील जनतेने नरेन्द्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.