Nigdi: रामदास आठवले यांनी अण्णा भाऊ साठे यांची माफी मागावी – लहू मुद्रा फाउंडेशन

एमपीसी न्यूज – अण्णा भाऊंच्या गीताचा अपभ्रंश करुन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांचा अपमान केल्याचा आरोप करत लहू मुद्रा फाउंडेशनने आठवले यांचा निषेध केला आहे. तसेच आठवले यांनी अण्णा भाऊंची आणि समाजाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे निगडीत विविध कार्यक्रम सुरु आहेत. रामदास आठवले यांनी आज (शनिवारी)या कार्यक्रमाला भेट दिली.

  • भाषणादरम्यान आठवले यांनी अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेल्या गीताचा अपभ्रंश केला. त्यामुळे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अपमान झाल्याचे आरोप लहू मुद्रा फाउंडेशनने केला आहे. आठवले यांच्या या वक्तव्यामुळे सर्व समाजाच्या भावना दुखावल्या असून समाज या गोष्टीचा तीव्र निषेध करत आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल सौंदडे, महेश खिलारे, राजेश आरसूळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.