Nigdi : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना उघडकीस

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना निगडी आणि भोसरी परिसरात उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी निगडी आणि भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 9) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात 31 वर्षीय पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, निखिल अतुल लोहार (वय 26) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून एप्रिल 2016 ते 22 नोव्हेंबर 2019 या कालावधीत निगडी आणि हिंजवडी येथील एका हॉटेलमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 20 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याच्या अडीच महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गुरुवारी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.