Nigdi: लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर बलात्कार

Nigdi: Rape of a girl on the pretext of marriage आरोपी खंडेवाल याने फिर्यादी मुलीशी कामामुळे झालेल्या ओळखीच्या आधारे हळूहळू जवळीक वाढवली.

एमपीसी न्यूज- कामामुळे झालेल्या ओळखीच्या आधारे हळूहळू जवळीक वाढवून व लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. मे 2018 ते जानेवारी 2020 या कालावधीत हा गुन्हा घडला.

याप्रकरी ब्रिजकिशोर देवेंद्र खंडेवाल (वय 26, रा. सिद्धलक्ष्मी कॅाम्पलेक्स, विठ्ठलवाडी, आकुर्डी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 28 वर्षीय मुलीने बुधवारी (दि.15) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खंडेवाल याने फिर्यादी मुलीशी कामामुळे झालेल्या ओळखीच्या आधारे हळूहळू जवळीक वाढवली. तसेच मुलीचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे अमिष दाखवले. मे 2018 पासून जानेवारी 2020 पर्यंत वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.