Nigdi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला. याप्रकरणी एका तरुणावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2017 ते ऑक्टोबर 2018 दरम्यान निगडी परिसरात घडला.

राजेश भीमराव वाघमोडे (वय 29, रा. निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश याने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. यातून त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नाला नकार देऊन तरुणीची फसवणूक केली. याबाबत तरुणीने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.
HB_POST_END_FTR-A2
You might also like