Nigdi : रेशनकार्डशिवाय धान्य देण्यास नकार दिल्याने रेशन दुकानातील कामगाराला मारहाण

एमपीसी न्यूज – रेशनकार्ड नसल्याने रेशन न देणाऱ्या रेशन दुकानातील कामगाराला एकाने दगडाने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी (दि. 11) सायंकाळी संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.

सचिन विठ्ठल शिवलकर (वय 36, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रवीण दिलीप कांबळे (वय 26, रा. अजंठानगर, चिंचवड. मूळ रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन हे संभाजीनगर येथील धनंजय उबाळे स्वस्त धान्य दुकानात कामाला आहेत. सोमवारी सायंकाळी रेशन दुकानात धान्य वाटपाचे काम सुरू होते. फिर्यादी आणि रेशन दुकानदाराचा मुलगा व आई दोघेजण रेशन वाटपाचे काम करत होते.

त्यावेळी आरोपी प्रवीण दुकानात आला. त्याच्याकडे रेशन कार्ड नव्हते. त्यामुळे फिर्यादी सचिन यांनी त्यास धान्य दिले नाही. या कारणावरून प्रवीण याने सचिन यांना दगडाने मारले. यात सचिन यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली.

तसेच शिवीगाळ करून धमकी देऊन आरोपी निघून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.