Nigdi : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त निगडीत धार्मिक कार्यक्रम

एमपीसी न्यूज – राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 50 व्या पुण्यतिथीनिमित्त निगडीमध्ये विविध धार्मिक कायक्रमाचे आयोजन केले आहे.

निगडीतील विदर्भ सहयोग मंडळाच्यावतीने प्राधिकरण येथील विदर्भ भवन सेक्टर नं. 27 मदनलाल धिंग्रा स्टेडियमजवळ रविवार (दि 16 डिसेंबरला) सायंकाळी सहा वाजता हभ श्रीकृष्ण सावळे यांचे कीर्तन होणार आहे. विदर्भ सहयोग मंडळ यांच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी कार्यपूर्तीनिमित्ताने कार्यक्रमवालीचे प्रकाशन उद्योजक शाम किर्तने, पुरुषोत्तम काळे यांच्या हस्ते होणार आहे. तर देणगीदार फलकाचे नामकरण पी. एम. गोळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अरुण इंगळे, शारंगधर पल्हाडे उपस्थित असणार आहे. महादेव तारक,  प्रा. सुरेंद्र नावडे, सुनील चोरे, ज्ञानेश्वर डगवार, सुरेश देसाई, विलास महल्ले यांचा यावेळी ग्रामगीता प्रचारक सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती निलेश म्हसाये यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.