Nigdi : ”रमजान ईद” दिवशी शहरात पूर्णवेळ पाणीपुरवठा करावा- सचिन चिखले

एमपीसी न्यूज – यंदा पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात पाणीकपात केली आहे. त्यामुळे रमजान ईद साजरा करण्याच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. पाणीकपातीचा नियम या सणासाठी शिथिल करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मुस्लिम समाज बांधवांचा ”रमजान ईद” हा सण संपूर्ण देशात उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने देशभरातील हिंदू-मुस्लिम बांधव समजातील जातीय तेढ विसरून एकत्र येतात. पिंपरी चिंचवड शहरातही ईद हर्षोल्हासात साजरी केली जाते. दि. ५ किंवा ६ जून या पैकी ज्या दिवशी रमजान ईद असेल, त्यादिवशी शहरामध्ये संपूर्ण वेळ पाणीपुरवठा करण्यात यावा. रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा मोठा उत्सव असून, शहरातील सर्व मुस्लिम बांधवाना ईद आनंदात साजरी करता यावी यासाठी हा निर्णय घ्यावा असे या निवेदनात चिखले यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.