Nigdi: स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या स्पर्धेचा निकाल जाहीर; कथा लेखन स्पर्धेत माधुरी विधाटे प्रथम

Nigdi: Results of Swatantryaveer Savarkar Mandal competition result announced; Madhuri Vidhate first in the story writing competition चार वेगवेगळी चित्रे देऊन व त्यांना अनुसरून समर्पक लिखाण करणे अशी ही वेगळी स्पर्धा होती. ग्रंथालयाने आयोजित केलेल्या या स्पर्धेस सर्व महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

एमपीसी न्यूज- स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या, रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालयातर्फे आयोजित कथा, काव्य व ललित लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कथा लेखनात माधुरी विधाटे, काव्य लेखनात योगेश उगले आणि ललित लेखनमध्ये माधवी पोतदार यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

रवींद्रनाथ ठाकूर ग्रंथालयातर्फे लॉकडाऊन कालावधीत वाचक, साहित्यिक यांच्यासाठी चित्रांना अनुसरून कथा, काव्य व ललित लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

चार वेगवेगळी चित्रे देऊन व त्यांना अनुसरून समर्पक लिखाण करणे अशी ही वेगळी स्पर्धा होती. ग्रंथालयाने आयोजित केलेल्या या स्पर्धेस सर्व महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांची नावे जाहीर करण्याचा कार्यक्रम शनिवारी (दि.20) सावरकर मंडळाच्या फेसबुक पेजवरुन प्रक्षेपित करण्यात आला. स्पर्धेची माहिती, नियोजन, स्पर्धकांचा सहभाग, परिक्षण आणि निकाल जाहीर करणे अशा सर्वच गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या.

स्पर्धेचा विभागनिहाय निकाल खालिलप्रमाणे –

* कथा लेखन
प्रथम क्रमांक: माधुरी विधाटे
द्वितीय क्रमांक: अर्चना वर्टिकर
तृतीय क्रमांक: उल्का खळदकर
उत्तेजनार्थ: जयश्री पाटील

* काव्य लेखन
प्रथम क्रमांक: योगेश उगले
द्वितीय क्रमांक: सुरेखा हिरवे
तृतीय क्रमांक: सुरेश सेठ
उत्तेजनार्थ: प्रकाश परदेशी

* ललित लेखन
प्रथम क्रमांक: माधवी पोतदार
द्वितीय क्रमांक: वंदना गुर्जर
तृतीय क्रमांक: पुष्पा नगरकर
उत्तेजनार्थ: सुनंदा जप्तीवाले

या स्पर्धेचे परीक्षण साहित्यिक रमेश वाकनिस, विनिता ऐनापुरे, अपर्णा देशपांडे व अश्विनी रानडे यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सचिव प्रदीप पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले.

स्पर्धेचे संयोजन चंद्रशेखर जोशी, सागर पाटील, विनित दाते व ग्रंथालय कर्माचारी यांनी केले होते. गीता खंडकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like