Nigdi : प्राधिकरणात भर दिवसा पाऊण लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी 73 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना प्राधिकरण येथे सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली.

मंगेश साहेबराव पवार (वय 34, रा. हरिओम अपार्टमेंट, पेठ क्रमांक 25, प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांचे घर सोमवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास बंद होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले 73 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. दुपारी सव्वादोनच्या सुमारास फिर्यादी पवार घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. यावरून त्यांनी तात्काळ निगडी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. निगडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक बनसोडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.