Nigdi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण वर्गात गौतम बुद्धांना अभिवादन

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा संघ शिक्षा वर्ग रविवारी (दि. 12) एसपीएम प्रशाला, यमुनानगर, निगडी येथे सुरू झाला. या वर्गात सुमारे 225 कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. आज (शनिवारी) बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

वर्गाधिकारी विठ्ठल शिंदे, वर्ग कार्यवाह सचिन भोसले, प्रांत कार्यवाह डॉ. प्रविण दबडगाव, क्षेत्रीय प्रचार प्रमुख प्रमोद बापट आदी मान्यवरांनी प्रतिमेस अभिवादन केले. वर्गाचे पालक मकरंद ढवळे यांनी बुद्धवंदना घेतली.

गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाने देशाला दिलेले योगदान व कार्य तरुण कार्यकर्ता स्वयंसेवकांना कथन केले. याप्रसंगी क्षेत्र प्रचारक अतुल लिमये, भारतीय बौद्धजन विकास समितीचे प्रमुख कार्यकर्ते विजय कांबळे, रमेश जाधव व प्रदीप पवार हे उपस्थित होते. हा प्रशिक्षण वर्ग २ जून पर्यंत चालणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.