Rupeenagar: महिला दिनानिमित्त आयोजित शिबिरात 400 महिलांची मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप

एमपीसी न्यूज – जागतिक महिलादिनाचे  औचित्य  साधून रुपीनगर, ताम्हणेवस्ती , तळवडे, त्रिवेणीनगर परिसरातील महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिर घेण्यात आले.  नगरसेवक प्रवीण भालेकर युवा मंच व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांनी शिबिराचे आयोजन   केले. नगरसेवक प्रवीण भालेकर यांच्या रुपीनगर जनसंपर्क कार्यालयात हे शिबिर झाले.

 

_MPC_DIR_MPU_II
या तपासणी शिबिरात परिसरातील सुमारे 400 महिलांनी नेत्र तपासणी करून घेतली. शिबिरामध्ये महिलांना अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी बोलताना प्रवीण भालेकर म्हणाले की, महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये,महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माया भालेकर, सविता सोनवणे, चंद्रशेखर कडलग, राम पडघन, संजय लोकरे, समाधान घुले, तेजस घोडके यांनी प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.