Nigdi : स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त ‘सावरकर दौड’

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या वतीने (Nigdi) सावरकर दौड आयोजित करण्यात आली. भक्ती शक्ती उद्यान ते स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान प्राधिकरण या मार्गावरून रविवारी (दि. 25) ही दौड करण्यात आली. दौडमध्ये विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मराठी आणि संस्कृत भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांचा स्वातंत्र्यवीर सावरकर भाषा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी सावरकर घराण्याचे वंशज सात्यकी सावरकर, असिलता सावरकर-राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार महेश लांडगे, अनुप मोरे, सरिता साने, धनंजय गावडे, राजू मिसाळ, तेजस्विनी कदम, अतुल इनामदार, अभिजित शाळू आदी उपस्थित होते.

Chakan : चाकण पतसंस्थेकडून सोलरसाठी वित्तपुरवठा 

अश्विनी कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, पूनम चव्हाण, प्रणाली पाटील, प्राजक्ता सईद, हभप गोरक्षनाथ महाराज उदागे, सखाराम पितळे, सरिता तारे, ज्योती लोखंडे, सुषमा चत्रे, शोभा शिर्के, आभा अभ्यंकर, भालचंद्र रोडे, धनश्री शेजवलकर, मंगल आंब्रे, अक्षय कुलकर्णी, श्वेताल महात्मा, श्रद्धा जोशी, गणेशदेव सोन्नर, दीपज्योती अत्रे, सरिता पट्टेवार, सुवर्णा बोरकर, प्राजक्ता रानडे या शिक्षकांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर भाषा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिन सोमवारी (दि. 26 फेब्रुवारी) आहे. त्यानिमित्त स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दौड, वाचन, चालणे असे आठ उपक्रम राबविले जात आहेत. त्यातील एक उपक्रम निगडी प्राधिकरण येथे राबविण्यात आला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आपण आपल्या दैनंदिन आचरणात आणले पाहिजे. सावरकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी त्यांनी लिहिलेले आणि त्यांच्यावर लिहिलेले साहित्य वाचणे फार गरजेचे असल्याचे भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर म्हणाले, “सावरकरांनी शिकवलेल्या शास्त्रासोबत देशहितासाठी शस्त्र चालवणे देखील आवश्यक आहे, हे समाजाने विसरू नये.”

ज्ञानदा संस्कृत प्रबोधिनीचे प्रवर्तक प्रा. गोरक्षनाथ महाराज उदागे म्हणाले, “संस्कृत भाषा शिकण्याचा ओघ कमी झाला आहे. विद्यार्थी संस्कृत शिकण्यासाठी पुढे येत नाहीत. पाश्चात्य भाषा शिकण्याकडे कल वाढत आहे. पाश्चात्य भाषा जरूर शिकाव्या पण आपली संस्कृत भाषा त्यासाठी विसरून चालणार नाही. सर्वांनी संस्कृत आणि मराठी भाषेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.”

सूत्रसंचालन शीतल कापशीकर यांनी केले. डॉ. सचिन बोधनी यांनी आभार मानले. प्रस्तावना श्रीनिवास कुलकर्णी (Nigdi)  यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.