Nigdi : कामाचे पैसे मागितल्याने सफाई कामगार महिलेला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – सफाई काम करणाऱ्या महिलेने केलेल्या (Nigdi) कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाने बेदम मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 21) सकाळी दहा वाजताच्या सुमारास निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.

हर्षद खान (वय 25, रा. कुदळवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत सफाई काम करणाऱ्या 42 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सिटी प्राइड बिल्डींगमध्ये साफसफाईचे काम करते. मागील तीन महिन्यांपासून महिलेने साफसफाईचे काम केले आहे. त्याचे पैसे तिने हर्षद खान याच्याकडे मागितले. मात्र, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. याच कारणावरून त्यांच्यात मंगळवारी सकाळी वाद झाला. त्या वादातून हर्षद खान याने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून हाताने बेदम मारहाण केली. यात महिलेचा रक्तस्त्राव झालेला आहे.

Alandi : पोलीस चौकी ते आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावर विक्रेते बसल्यास होणार कारवाई

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान याप्रकरणी (Nigdi) निगडी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने निगडी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.