Nigdi : ऑर्डर देऊन नाष्टा देण्यास उशीर लावल्याने विचारणा करणा-या ज्येष्ठ नागरिकाला वेटरकडून मारहाण

एमपीसी न्यूज – नाष्ट्याची ऑर्डर दिल्यानंतर नाष्टा देण्यासाठी वेटरने वेळ लावला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाने वेटरकडे विचारणा केली. या रागातून वेटरने ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 1) सकाळी साडेदहाच्या सुमारास ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडली.

अशोक गोपाळराव पवार (वय 60, रा. यमुनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आफ्रिदी शेख ऊर्फ अस्मान (रा. स्वागत हॉटेल, ट्रान्स्पोर्टनगर, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार शनिवारी सकाळी ट्रान्सपोर्टनगर येथील स्वागत हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेले. त्यांनी नाष्ट्याची ऑर्डर दिली. ऑर्डर देऊन बराच वेळ झाला तरी ऑर्डर आली नाही. त्यामुळे पवार यांनी वेटरला याबाबत विचारले.

त्यावरून उस्मानने त्यांच्याकडे रागाने बघितले. वेटर उस्मान रागाने बघत असल्याने पवार यांनी विचारणा केली. त्यावरून उस्मानने पवार यांना शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. यामध्ये पवार यांच्या डोळ्याला दुखापत झाली. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.