Nigdi : मोटार कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने जेष्ठ नागरिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – हुंदाई मोतटार कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे. तुम्ही घरून काम करू शकता असे सांगत ज्येष्ठ नागरिकाकडून एक लाख दहा हजार सहाशे रुपये घेतले. पैसे घेऊन ज्येष्ठ नागरिकाला नोकरी न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 11 ते 15 एप्रिल 2019 या कालावधीत निगडी येथे घडला.

जोसेफ रजिनाल्ड मेंडोंसा (वय 61, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोसेफ यांना नोकरीची गरज होती. त्यामुळे त्यांनी गुगल वेबसाईटवर नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज केला. त्यावेळी आरोपीने त्यांना ऑनलाइन मोटार कंपनीमध्ये घरून काम करण्यासाठी त्यांची निवड झाली असल्याचे सांगितले. नोकरी सुरू करण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून जोसेफ यांच्याकडून एक लाख दहा हजार सहाशे रुपये बँक खात्यावर भरून घेतले. पैसे घेऊन जोसेफ यांना नोकरी दिली नाही. याबाबत जोशी यांनी निगडी पोलिसात गुन्हा नोंदवला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.