Nigdi : दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मोपेड दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 28) रात्री आठच्या सुमारास निगडी-भोसरी रोड, दुर्गानगर येथे घडली.

कांतीलाल काशिनाथ साळुंके (वय 60) असे दुचाकीच्या धडकेत मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. गणेश राजेंद्र साळुंके (वय 27, रा. दुर्गानगर, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोपेड दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी गणेश यांचे चुलते कांतीलाल हे निगडी-भोसरी रोडवर दुर्गानगर येथे पवनराजे फॅब्रिकेशन समोर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या मोपेड दुचाकीने कांतीलाल यांना धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कांतीलाल यांचा मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.