Nigdi : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. तसेच अल्पवयीन मुलीने आरोपीचा प्रतिकार केला असता आरोपीने मुलीला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना अजंठानगर, कृष्णानगर चिंचवड,  तळेगाव दाभाडे आणि शरदनगर चिंचवड येथे घडली.

विशाल लालू राठोड (वय 22, रा. मोरेवस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने निगडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 28) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 21 फेब्रुवारी ते 22 मार्च 2020 या कालावधीत घडली. आरोपीने फिर्यादी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला राहत्या घरातून फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर आरोपीने मुलीला तळेगाव दाभाडे व शरदनगर चिंचवड येथील त्याच्या मित्रांच्या रूमवर नेऊन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. यावेळी अल्पवयीन मुलीने आरोपीला नकार दिला असता आरोपीने मुलीला मारहाण व शिवीगाळ केली.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.