Nigdi : प्राधिकरणात बुधवारी शरद पोंक्षे यांचे ‘सावरकर विचार दर्शन’ या विषयावर व्याख्यान

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

एमपीसी न्यूज – दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले आहे. ‘सावरकर विचार दर्शन’ या विषयावर ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर व अटलबिहारी वाजपेयी यांना यावेळी अभिवादन करण्यात येणार आहे. निगडी येथील खान्देश मित्र मंडळ, काचघर चौक, प्राधिकरण येथे बुधवारी (दि. 25 डिसेंबर 2019) सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होईल.

यावेळी महापौर उषा ढोरे, खासदार अमर साबळे, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लोकलेख समितीचे अध्यक्ष ॲङ सचिन पटवर्धन, महापालिका सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, खादी ग्रामोद्योगचे महाराष्ट्र अध्यक्ष हेमंत तापकीर, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, उमा खापरे, मा. महापौर आर.एस. कुमार, नितीन काळजे, राहुल जाधव, चिंचवड विधानसभा संयोजक नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, पिंपरी विधानसभा संयोजक राजू दुर्गे, भोसरी विधानसभा संयोजक विजय फुगे, भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अमर मुलचंदानी, महेश कुलकर्णी, राजेश पिल्ले, प्रमोद निसळ, प्रकाश जवळकर, महादेव कवीतके, अनुप मोरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

‘आम्ही सारे सावरकर’ या संकल्पनेनुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावकर यांचे यांचे वैचारिक वारसदार म्हणून शरद पोंक्षे यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या वाणीतून ओघवत्या शैलीत सावरकर यांच्या विचारांचे दर्शन घडणार आहे.

भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा, सर्व सावरकर प्रेमी व अमोल थोरात युथ फाऊंडेशन, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने आयोजन केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सर्व प्रेमींनी व नागरिकांनी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक व भाजपा संघटन सरचिटणीस मा. अमोल थोरात यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.