Nigdi: श्री दत्त शिवलिंगेश्वर मंदिर व्यस्थापन ट्रस्टतर्फे दत्त जयंती सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – श्री दत्त शिवलिंगेश्वर मंदिर व्यस्थापन ट्रस्टतर्फे यमुनानगर येथे हजारो भक्तांच्या उपस्थितीत दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके, महापौर उषा ढोरे, उद्योजक राजेश सांकला यांच्या हस्ते भव्य अन्नदान छत्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी नगरसेविका सुमन पवळे, नगरसेवक सचिन चिखले, उत्तम केंदळे, माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे, बापू घोलप, कान्हेचे नवनिर्वाचित सरपंच विजय सातकर उपस्थित होते. यावेळी ट्रस्टच्या वतीने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दत्तजन्म सोहळा पाळणा म्हणून पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. आरतीनंतर 7 ते 8 हजार भाविकांनी डाळ भात, सांबर , लापशी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पवळे, मंडळाचे कार्याध्यक्ष किशोर इंगवले, हनुमंत नायडू महाराज, रामदास गुंजाळ, चांगदेव कोलते, संजय कुलकर्णी, मनोहर दिवाण, जयप्रकाश गावडे, संतोष कवडे, विजय मंत्री कार्यकर्त्यांनी संयोजनात पुढाकार आयोजनात सहभाग घेतला. सूत्रसंचालन कवी राजेंद्र कोरे यांनी केले. रामदास गुंजाळ यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.