Nigdi : कंपनीमधून सहा लाखांचे लॅपटॉप गायब

एमपीसी न्यूज – चिंचवडमधील ग्रीव्हज कॉटन कंपनीच्या आयटी विभागामधून सुमारे सहा लाख रुपये किंमतीचे 12 लॅपटॉप अज्ञाताने चोरून नेले. हा प्रकार शनिवारी (दि. 6) ते सोमवारी (दि. 8) या कालावधीत घडली.

गिरीश उपेंद्र क-हाडे (वय 38, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथे ग्रीव्हज कॉटन कंपनी आहे. या कंपनीच्या आयटी विभागामधून शनिवार ते सोमवार या कालावधी दरम्यान कंपनीमधील अज्ञात इसमाने सहा लाख रुपये किमतीचे डेल कंपनीचे 12 लॅपटॉप चोरून नेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.