Nigdi : पोलिसांनी केला सोळा हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

0

एमपीसी न्यूज – प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करून त्याच्याकडून 16 हजार 452 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 25) ओटास्कीम, निगडी येथे करण्यात आली.

मेहबूब हुसेन करवल (वय 24, रा. ओटास्कीम, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संतोष शामराव सावंत (वय 33, रा. पिंपळे गुरव) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निगडी परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी मोपेड दुचाकीवरून (एम एच 14 / जी जे 7869) आरोपी प्रतिबंधित गुटखा विक्री करण्यासाठी बाळगताना आढळून आला. आरोपीकडून 16 हजार 452 रुपयांचा गुटखा जप्त करत त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 188, 272, 273, 328 तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2
You might also like