Nigdi : सोपान खुडे यांना कलारत्न पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे नुकत्याच झालेल्या अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाच्या समारोप प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे यांना समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र, फकिरा कादंबरीची प्रत आणि रोख 11 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे, कमलताई घोलप, अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे सदस्य अमित गोरखे, अरुण जोगदंड, सन्दिपान झोम्बाड़े भाऊसाहेब अडागळे उपस्थित होते.

सोपान खुडे हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेलपिंपळगाव शाळेतून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले असून त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. तमाशा कलावंतांच्या जीवनावरील विनोदसम्राट काळू बाळू, तमाशातील वगनाट्य, तमाशातील फार्स, देवाची माणसे, आखाड बळी ही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.