Nigdi : काश्मीरी लाल यांचे ‘स्वदेशी आज के संदर्भ मे’ या विषयावर बुधवारी निगडीत व्याख्यान

एमपीसी न्यूज- स्वदेशी विचाराबाबत जागरुकता वाढविण्याचे काम करणा-या स्वदेशी जागरण मंचातर्फे अखिल भारतीय संघटक काश्मीरी लाल यांचे ‘स्वदेशी आज के संदर्भ मे’ याविषयावर येत्या बुधवारी (दि. 13) व्याख्यान आयोजित केले आहे. याबाबतची माहिती मंचाच्या पिंपरी-चिंचवडच्या संयोजिका उत्कर्षा कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

निगडी, प्राधिकरणातील सावरकर सदनातील कॅप्टन कदम सभागृहात बुधवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेत हे व्याख्यान होणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

स्वदेशी जागरण मंच हे एक अखिल भारतीय बिगर राजकीय संघठन आहे. स्वदेशी विचारांचा सर्व क्षेत्रात आग्रह असावा. त्याचा वापर वाढावा. यासंबंधी जागरूकता वाढविण्याचे काम स्वदेशी जागरण मंचाव्दारे केले जाते. मंचाचे अखिल भारतीय संघटक काश्मीरी लाल यांचे ‘स्वदेशी आज के संदर्भ मे’ याविषयावर शहरात व्याख्यान आयोजित केले आहे.

शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंचाच्या पिंपरी-चिंचवडच्या संयोजिका उत्कर्षा कुलकर्णी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.