Nigdi : फुलांची ऑर्डर रद्द केल्याने फूल विक्रेत्याने केले ग्राहकावर कोयत्याने वार; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची असल्याने फूल विक्रेत्याला फुलांची ऑर्डर दिली. त्यानंतर काही कारणास्तव ती ऑर्डर रद्द केली. यावरून फुल व्यावसायिकाने ग्राहकावर कोयत्याने वार केले. यामध्ये ग्राहक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 10) दुपारी साडेचारच्या सुमारास महावीर पथ प्राधिकरण निगडी येथे घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

पांडुरंग दत्तात्रय अवघडे (वय 30, रा. अष्टविनायक चौक, बालेवाडी), अरुण मारुती सुकरे (वय 34, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गौतम खेमचंद जैन (वय 54, रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ दिलीप जैन हे प्राधिकरण निगडी येथे राहतात. त्यांच्या घरी देवाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होता. त्यासाठी त्यांनी आरोपींना फुलांची ऑर्डर दिली. काही कारणास्तव दिलीप यांना ती फुलांची ऑर्डर रद्द केली. याचा राग मनात धरून आरोपी दिलीप यांच्या घरी आले. त्यावेळी फिर्यादी गौतम घरी होते. आरोपींनी गौतम यांना ढकलून दिले. दिलीप यांच्या मानेवर, डोक्यात आणि हातावर कोयत्याने वार केले. यात दिलीप गंभीर जखमी झाले. त्याचबरोबर आरोपींनी दिलीप यांची अॅक्टिवा गाडीची (एम एच 12 / पी व्ही 7804) तोडफोड करून नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.