BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केले. रविवारी (दि. 14) पहाटे साडेबाराच्या सुमारास निगडीतील बीआरटी बसस्थानकाजवळ ही घटना घडली.

या प्रकरणी सागर बासुराज पवार (वय 27, रा.ओटा स्कीम, निगडी) याने फिर्याद दिली असून दाद्या गवळी, छोट्या मगर, शाहरुख शेख, डॅन्या यांच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर व त्याच्या मित्र रविवारी पहाटे निगडी परिसरातून दुचाकीवर जात होते. त्यावेळी पूर्वीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी त्यांना निगडी बीआरटी बस स्थानकाजवळ अडवले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सागर याच्या मित्रावर कोयत्याने वार करून पळ काढला. यामध्ये दोघे जखमी झाले असून पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.