Nigdi : पक्ष संघटन मजबूत करा; पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते पार्थ पवार यांनी पुढाकार घेतला आहे. प्रभागनिहाय बैठका घेऊन पक्ष संघटना बांधत आहेत. निगडीत आढावा घेऊन त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आणि पक्ष बांधणीचे उद्दिष्ट समोर ठेऊन राष्ट्रवादीच्या वतीने प्रभागनुसार बैठका घेण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत रविवारी (दि.28) प्राधिकरणातील केरला भवन येथे बैठकीचे आयोजन केले होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रवक्ते फजल शेख, प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक राजू मिसाळ, विशाल वाकडकर उपस्थित होते.

  • यावेळी पार्थ पवार म्हणाले, बूथ कमिटी व पक्षसंघटन मजबूत करा, कोणीही नेता पक्ष सोडून गेला तरी कार्यकर्ते त्याच्याबरोबर जाऊ नयेत, यासाठी हे संघटन महत्त्वाचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.