Nigdi : देवगड येथे सहलीसाठी गेलेल्या सहा जणांना वाचवण्यात यश; अजूनही एकजण बेपत्ता

एमपीसी न्यूज : देवगड येथे सहलीसाठी गेलेल्या निगडी येथील (Nigdi) संकल्प सैनिक अ‍कॅडमीच्या चार विद्यार्थिनीचा मृत्यू झाला तर अजून एकजण बेपत्ता असून त्याची शोधमोहीम सुरु आहे. तर यामध्ये 6 जणांना वाचवण्यात यश आले आहे. या ट्रीपमध्ये साधारण 35 विद्यार्थी होते. यातील काही जण देवगड पवनचक्कीच्या खालील गार्डनच्या बाजूला असलेल्या समुद्रात पोहोण्यासाठी उतरले. समुद्रातील पाण्याचा अंदाज आला नसल्याने विद्यार्थी पाण्यात बुडाले.

विद्यार्थी पाण्यात बुडाल्याची घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह पोलीस सहकारी, तहसीलदार रमेश पवार, नगराध्यक्ष साक्षी प्रभू घटनास्थळी दाखल झाले होते.

Pune : सैनिक अकादमीच्या प्रशिक्षणार्थींचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी – अजित पवार

यातील 5ते 6 जणांना पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. पाण्यातून बाहेर काढण्यात आलेल्या 5 ते 6 जणांना देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुडालेल्यांपैकी 4 जणांचा मृत्यू झाला असून एकजण अजून बेपत्ता (Nigdi) आहे. राम डीचोलकर असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. पोलीस आणि बचाव पथक त्याचा शोध घेत आहेत. या सहा मुलांचे वय 18 ते 24 वर्ष वयोगटातील असल्याची माहिती देवगड तहसीलदारांकडून देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.