Nigdi : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चारित्र्यावर संशय घेऊन पती विनाकारण त्रास देत असल्याने त्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 17 जानेवारी रोजी त्रिविहार सोसायटी निगडी येथे घडली. याप्रकरणी गुरुवारी (दि. 23) पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोशनी भास्कर बेदरकर (वय 28) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेचे वडील अनिल दत्तात्रेय काटकाडे (वय 55, रा. मुळावा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती भास्कर ज्ञानोबा बेदरकर (वय 36, रा. त्रिविहार सोसायटी, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भास्कर याने फिर्यादी यांची मुलगी रोशनी यांना चारित्र्यावर संशय घेऊन त्रास दिला. या त्रासाला कंटाळून रोशनी यांनी 17 जानेवारी रोजी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत आरोपी पती विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.