Nigdi : दिवाळीनिमित्त अंध बांधवांसाठी फराळ व कपडे वाटप

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड अंधसंघ व जयहिंद इंडस्ट्रीज आकुर्डी मधील सामाजिक कार्यकर्ते व भूगोल फाउंडेशनच्या सहकार्याने दिवाळीनिमित्त पिंपरी-चिंचवड मधील अंध बांधवांना नवीन साड्या वाटप व दिवाळीचा फराळ देण्यात आला.

निगडी येथील श्रीकृष्ण मंदिर येथे हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ गावडे, अण्णा येवले, अंध संस्था पिंपरी-चिंचवडचे नामदेव भोर व त्यांचे इतर सहकारी, जयहिंद इंडस्ट्रीजचे दिलीप काशीद, किरण रेनके, संतोष मिसाळ, महिंद्र साठे, माने, दिनेश च-हाटे, साहेबराव साठे, श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे हरिदास नायर, भूगोल फाउंडेशनचे विठ्ठल वाळुंज, सुहास चव्हाण व सहकारी उपस्थित होते.

मंदिर ट्रस्टच्या वतीने उपस्थित सर्व अंध बांधवांना चहा व नाष्टा देण्यात आला. हा कार्यक्रम मागील दहा वर्षापासून आयोजित केला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.