Nigdi : अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सदस्यपदी तानाजी काळभोर यांची निवड

एमपीसी न्यूज- निगडी येथील श्री खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष तानाजी (अण्णा) बळवंत काळभोर यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सदस्यपदी एकमताने निवड करण्यात आली.

अखिल भारतीय वारकरी मंडळ पिंपरी चिंचवड शहर यांची सभा थेरगाव येथे अतिशय उत्साहाने पार पडली. यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले व प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख आणि पिंपरी चिंचवड विभागीय अध्यक्ष ह.भ.प.देवीदास महाराज बारणे यांचे सहीचे प्रमाणपत्र व निवडीचे पत्र यावेळी तानाजी काळभोर यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.या बैठकीला पिंपरी चिंचवड व मावळ आणि हवेली मधील सर्व महाराज मंडळी व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काळभोर हे निगडी येथील खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असून कला, क्रीडा, सहकार, सामाजिक, सांस्कृतिक अध्यात्मिक अशा विविध क्षेत्राशी त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. त्यांच्या निवडीबद्दल पिंपरी चिंचवड शहरात त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.