BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : टेम्पोला दुचाकी आडवी लावून लुटले

175
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – मालवाहतूक करणा-या टेम्पोला दुचाकी आडवी लावून टेम्पो थांबवला. टेम्पोची तोडफोड करत टेम्पोचालकला लुटले. ही घटना बुधवारी (दि. 13) रात्री साडेअकराच्या सुमारास अजंठानगर चिंचवड येथे घडली.

जीवन भगवान साळवे (वय 31, रा. पिंपरी आंधळे, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जीवन हे टेम्पोवर (एम एच 14 / ई एम 9237) चालक म्हणून काम करतात. बुधवारी रात्री ते टेम्पोत माल भरून सहकारी तुषार पवार यांच्या सोबत जात असताना अजंठानगर येथील टीसीआय कंपनीजवळ आले असता अज्ञात आरोपीने त्याची दुचाकी टेंपोला आडवी लावली. त्यामुळे साळवे यांनी टेम्पो थांबवला. आरोपीने टेम्पोची समोरची काच, हेडलाईट कोयत्याने तोडून टेम्पोचे नुकसान केले. साळवे यांचे सहकारी तुषार यांच्याकडील रोख रक्कम 16 हजार रुपये कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3