Nigdi : गरबा आणि दांडियाला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ, हिंद विजय तरुण मंडळाच्या आयोजन

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २८, सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ आणि हिंद विजय तरुण मंडळ यांच्या तर्फे गेली तीस वर्षे नवरात्रीला गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात येते. तरुण- तरुणींचा आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. प्राधिकरणातील सर्वात जुन्या सार्वजनिक मंडळांपैकी एक असलेले हे मंडळ सामाजिक भान जपणारे आहे.

रक्तदान शिबिर, नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन मंडळातर्फे नियमितपणे करण्यात येते. श्रीकांत पांढरे हे मंडळाचे अध्यक्ष असून संभाजी पार्टे, तुषार भोसले, उमाजी शिंदे, अशोक रसाळ, उमेश गरुड, राहुल काळे आणि व्यंकटेश पुरोहित हे मंडळाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.